'मी शारीरिक छळाला कंटाळली आता' video

23 Jul 2025 13:46:37
मुंबई,
Tanushree Dutta तनुश्री दत्ताच्या भावनिक व्हिडीओनं पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. #MeToo चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. अत्यंत भावनिक आणि धक्कादायक असलेल्या या व्हिडीओमध्ये ती गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्वतःच्या घरातच मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत असल्याचा आरोप करताना दिसते.
 

Tanushree Dutta  
या Tanushree Dutta  व्हिडीओमध्ये तनुश्री म्हणते, “मी खूप त्रासले आहे. पोलीस बोलावले होते, त्यांनी सांगितलं की तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाण्यात या. पण माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. मी आजारी आहे. काम करू शकत नाही. मानसिक, शारीरिक छळ सहन करत आहे.” तिच्या या शब्दांनी तिच्या आतल्या वेदनेचं स्पष्ट दर्शन घडतं. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये तिने कुणाचंही नाव घेतलेलं नसतानाही "घरातच" छळ होत असल्याचा पुनःपुन्हा उल्लेख केल्याने तिने घरातल्या कोणावर तरी अप्रत्यक्षपणे आरोप केले असावेत, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.
 
 
या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तिच्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील काही कलाकार तिच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत आहेत. काहींनी तिला मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं आहे, तर काहींनी तिच्या पूर्वीच्या अनुभवांचा उल्लेख करत या गंभीर आरोपांची योग्य ती चौकशी होण्याची मागणी केली आहे.
 
 
 
 
 
तनुश्री दत्ताने Tanushree Dutta  २००४ मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब जिंकला होता आणि त्याच वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवलं होतं. ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट’, ‘ढोल’, ‘भागम भाग’ यांसारख्या चित्रपटांतून तिने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली. मात्र २०१३ नंतर तिने सिनेसृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं. २०१८ मध्ये तिने नाना पाटेकर, गणेश आचार्य आणि 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या टीमवर गंभीर आरोप करून देशात #MeToo चळवळीची सुरुवात केली होती. तिच्या त्या धाडसी वक्तव्यांनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्या पाठीशी उभं राहत तिला समर्थन दिलं होतं.आता पुन्हा एकदा तनुश्री दत्ताच्या या भावनिक आणि गंभीर व्हिडीओमुळे तिच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, याबद्दल नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तिच्या आरोपांवर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी सोशल मीडियावर तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांवरून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे तनुश्रीच्या या संघर्षाला दिशा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0