हरियाली तीज खरेदीसाठी दिल्लीतील टॉप ५ बाजारपेठा

    दिनांक :23-Jul-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi for Hariyali Teej shopping हरियाली तीज हा सण भारतात विशेषतः महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. हा सण प्रत्येक स्त्रीसाठी सौंदर्य, संस्कृती आणि परंपरेचा संगम असतो. विशेषतः उत्तरेतील राज्यांमध्ये, या दिवशी हिरव्या रंगाचे विशेष महत्त्व असते. हिरवे कपडे, हिरव्या बांगड्या, झुमके, चांदीचे किंवा कुंदनचे दागिने, मेंदीचे डिझाइन, आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी यासाठी महिला बाजारपेठेत गर्दी करताना दिसतात. तुम्ही जर दिल्लीमध्ये राहत असाल किंवा सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी दिल्लीमध्ये यायचा विचार करत असाल, तर येथे पाच अशा बाजारपेठा आहेत ज्या तुमची खरेदी अनुभव खास आणि बजेटमध्ये ठेऊ शकतात.
 
Hariyali Teej shopping
 
चांदणी चौक- पारंपरिकतेची शान
दिल्लीतील चांदणी चौक ही एक ऐतिहासिक बाजारपेठ असून इथे सणाच्या काळात खरेदीला वेगळीच झळाळी असते. तीजसाठी इथे तुम्हाला पारंपरिक साड्या, बनारसी आणि चिकनकारी लेहेंगा, सुशोभित सूट्स, आणि अस्सल फॅब्रिक मिळेल. 'कटरा नील'मध्ये फॅब्रिक आणि डिझाइनचा भक्कम संग्रह आहे, तर 'दरबा कलान' ही दागिन्यांसाठी एक प्रसिद्ध गल्ली आहे. Delhi for Hariyali Teej shopping येथे चांदीचे पारंपरिक दागिने, कुंदन ज्वेलरी, तसेच सुंदर बांगड्या आणि मेंदी सहज उपलब्ध असते. बजेटपासून प्रीमियम पर्यायांपर्यंत सर्व काही येथे मिळते.
 
सरोजिनी नगर मार्केट- स्टाईल आणि किफायतशीरपणा यांचा मिलाफ
जर तुम्हाला कमी पैशात जास्त फॅशन हवी असेल, तर सरोजिनी नगर हा उत्तम पर्याय आहे. दिल्लीतील युवक आणि कॉलेज गोईंग मुली यांचे हे आवडते ठिकाण आहे कारण येथे तुम्हाला ट्रेंडी कुर्ती, टॉप्स, फ्यूजन ड्रेस, आणि अॅक्सेसरीज सहज मिळतात. सणासाठी खास हिरव्या रंगाचे पोशाख येथे विविध प्रकारांत मिळतात. Delhi for Hariyali Teej shopping याशिवाय येथे ऑक्सिडाइज्ड दागिने, मोठे झुमके, चंकी नेकपीस आणि रंगीबेरंगी बांगड्यांची भरपूर व्हरायटी आहे. एकाच जागी पूर्ण लूक तयार होतो, तोही अगदी बजेटमध्ये.
 
करोल बाग मार्के- विविधतेचा महाउत्सव
करोल बाग हे पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेले एक मोठे खरेदी केंद्र आहे. तीजच्या निमित्ताने येथे तुम्ही डिझायनर साड्या, लेहेंगा, अनारकली सूट्स अशा क्लासिक पर्यायांसोबत ट्रेंडिंग डिझाईन्सही मिळवू शकता. 'गफ्फार मार्केट' हे सौंदर्यप्रसाधने आणि अॅक्सेसरीज खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. Delhi for Hariyali Teej shopping करोल बागमधील सोन्याचांदीचे पारंपरिक दागिने, आकर्षक फॅशन ज्वेलरी आणि सुंदर बांगड्या हे तीजच्या लूकला उठाव आणतात. येथे सौंदर्यप्रसाधनांचे ब्रँडेड आणि लोकल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
 
जनपथ मार्केट- कला आणि हटके स्टाईलचा संगम
जनपथ मार्केट ही बाजारपेठ त्यांच्या बोहेमियन आणि हँडमेड वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि डोळे खिळवून ठेवणारं हवं असेल, तर येथे एकदा नक्की भेट द्या. Delhi for Hariyali Teej shopping येथे पारंपरिक राजस्थानी आणि तिबेटी दागिन्यांपासून ते रंगीबेरंगी बांगड्या, हस्तनिर्मित पर्सेस, कापडं, स्कार्फ आणि सँडल्सपर्यंत सर्व काही मिळते. तीजसाठी बोहो-इथनिक लूक हवा असेल तर जनपथ हे योग्य ठिकाण आहे.
 
लक्ष्मी नगर मार्केट- स्थानिक आणि किफायतशीर खरेदीचे ठिकाण
पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर मार्केट हे स्थानिकांना खूप प्रिय आहे. येथे पारंपरिक कपडे, बांगड्या, कुर्ती आणि सौंदर्यप्रसाधनांची दुकानं गर्दीने भरलेली असतात. Delhi for Hariyali Teej shopping तीजच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, हिरव्या रंगाचे ड्रेस, मॅचिंग दागिने आणि सुंदर रेशमी साड्या येथे स्वस्तात मिळतात. बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल, तरी दर्जाशी तडजोड न करता येथे सर्व गरजा भागतात.
 
एकूणच काय?
हरियाली तीजसाठी दिल्लीतील या बाजारपेठा म्हणजे विविध पर्यायांचा खजिना आहेत. तुम्ही पारंपरिक पेहरावात साजेशी साडी शोधत असाल, की बोहो लूकसाठी काही हटके आयटम्स, प्रत्येकाच्या गरजा भागवणारी आणि खिशाला न परवडणारी ठिकाणं आहेत. Delhi for Hariyali Teej shopping आणि हो, खरेदी करताना थोडं बार्गेनिंग करायला विसरू नका – दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये त्याशिवाय मजा नाही!