तभा वृत्तसेवा
पुसद,
yayati-naik : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे, महाराष्ट्राचे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र, महाराष्ट्र सरकारमधील विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू ययाती मनोहर नाईक यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट दिल्ली येथील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यालयात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक सर्वेंद्रसिंह ठाकूर, भाजपाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद मेमन, खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ययाती मनोहर नाईक यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या प्रवेशाने संघटना अधिक मजबूत होईल असे सांगितले.