वर्धा,
charkha-bhavan वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे झपाट्याने काम सुरू आहे. २२ रोजी निरामय वर्धा या अभियानानिमित्त भाजपाचे नवनियुत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा दौरा झाला. ना. गिरीष महाजनही येऊन गेले. आता २८ रोजी भारतीय जनता पार्टीची विदर्भाची बैठक सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे होणार असुन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्यासह ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वारे गरम झाले आहेत. यासोबतच जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानिमित्ताने वर्धेत भारतीय जनता पार्टीची विदर्भाची बैठक होत आहे. वर्धेत विदर्भातील भाजपा पदाधिकार्यांची होणारी ही पहिलीच बैठक ठरणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, विदर्भातील सर्व मंत्री, सर्व आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आजी माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष असे जवळपास ७०० पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी सांगितले. समारोप कार्यक्रमाला शतिकेंद्र प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याने या जवळपास १ हजार पदाधिकारी या बैठकीत सहभागी होण्याची शयता त्यांनी वर्तवली.charkha-bhavan सुरुवातीला ही बैठक केळझर येथे नियोजित करण्यात आली होती. यशवंत महाविद्यालय हे बैठकीचे स्थानही निश्चित करण्यात आले होते. परंतु, पावसामुळे बैठकीचे नियोजन बिघडू नये यासाठी चरखा भवन येथे बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस केळझर येथे सिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन वर्धेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.