अमरावतीसाठी 128 कोटीचा सीसीटीव्ही प्रकल्प मंजूर

24 Jul 2025 09:37:48
अमरावती,
cctv-project-approved-for-amravati अमरावती शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण, महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १२८ कोटींचा अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे.
 
 
cctv-project-approved-for-amravati
 
या प्रकल्पामुळे अमरावतीमध्ये एक आधुनिक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि २४ बाय ७ कार्यरत सीसीटीव्ही निगराणी व्यवस्था उभी राहणार आहे. यामध्ये शहरातील मुख्य चौक, अन्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, महत्त्वाच्या इमारती आणि वाहतूक नियंत्रण केंद्रांचा समावेश असणार आहे. cctv-project-approved-for-amravati खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. डॉ. बोंडे यांच्या मागणीनंतर गृहविभाग आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने डीपीआर तयार करून शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळून आता लवकरच काम सुरू होणार आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले
हा प्रकल्प अमरावतीच्या विकासदृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, महिलांची सुरक्षितता वाढेल आणि वाहतुकीचे व्यवस्थापन सुधारेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प मंजूर होऊ शकला.
Powered By Sangraha 9.0