अमरावती,
chakkajam-agitation शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" अशा घोषणा देत टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.
बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका करत, “आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली,” असे जाहीर केले. त्यांनी पुढील आंदोलन 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी करण्याचा इशाराही दिला आहे.chakkajam-agitation दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी खुद्द बच्चू कडूंनी पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हटले.
या आंदोलनामुळे सरकारवर पुन्हा एकदा दबाव निर्माण झाला असून, राज्यात आगामी काळात आंदोलन तीव्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.