नकोडा रेती घाटावर महसूल विभागाची धाड

24 Jul 2025 21:16:53
घुग्घूस, 
raid-on-sand-ghat : येथून जवळच असलेल्या नकोडा येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास महसूल व पोलिस विभागाने धाड टाकून 1 जेसीबी यंत्र, 2 बोटीसह 130 ब्रास रेती साठा जप्त केला.
 

HJIKH 
 
नकोडा येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर जेसीबी यंत्र व 2 बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचे उत्खनन सुरु असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळाली. माहिती कळताच महसूल विभाग व पोलिसांनी घटनास्थळी पोहचून धाड टाकली व जेसीबी यंत्र, 2 बोट व 130 ब्रास रेती साठा असा करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार सचिन खंडाळे, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी मनोज कांबळे, मनोज शेंडे, नवनाथ गोडघासे कोतवाल परशुराम पेंदोर पोलिस पाटील प्रणय कांबळे यांनी केली. पुढील तपास घुग्घूस पोलिस करीत आहे.
Powered By Sangraha 9.0