नागपूर ,
Swavalambi Nagar Ram Mandir स्वावलंबी नगर राम मंदिरात योग वर्ग व पूर्णब्रम्ह सेवा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामनगर राममंदिर योग शिक्षक सावदेकरआणि प्रांजली जोशी होते. कार्यक्रमाची सुरुवात दिव्यप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी स्वाती खानापूरकर यांनी स्वागत गीत सादर केले. स्व. नानासाहेब मुळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रवेश परीक्षेतील यशाबद्दल विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रज्ञा मुंनशीवार व मीना अमरावतीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.Swavalambi Nagar Ram Mandir गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शनपर भाषण व योग गुरू जनार्दन स्वामी यांचे स्मरण झाले.आभार प्रदर्शन सुलेखा कुळकर्णी यांनी केले. आणि अल्पोपहार यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. आयोजनात सपना रोडी व पूर्णब्रम्ह समितीच्या महिला सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.
सौजन्य:सपना रोडी,संपर्क मित्र