मानोरा,
accidents-cracked शहरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देवठाणा या गावाकडे जिथे फाटा फुटतो त्या उतारावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण द्वारा निर्मित महामार्गाच्या मध्यभागी पडलेली भेग दिवसेंदिवस धोकादायक होत असून अनेक दुचाकी, तीन चाकी स्वारांचे यामुळे पडून अपघात झाले असून जीवित हानी झाल्यावरच या धोकादायक भेगेची दुरुस्ती सबंधित विभाग करेल काय ? असा प्रश्न वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.
अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मानोरा शहराच्या मध्यभागातून गेलेला असून, मानोरा मंगरूळनाथ रस्त्यावर देवठाणा फाट्यालगत उतारावर या महामार्गाच्या उजव्या आणि डाव्या मार्गीकेच्या मधोमध मोठी भेग पडलेली आहे ज्यामुळे मंगरूळनाथ कडे जाणार्या व मानोराकडे येणार्या दुचाकी स्वारांसाठी आणि प्रवासी वाहतूक करणार्या तालुयातील रिक्षांसाठी सुद्धा ही भेग अपघातास निमंत्रण देऊन धोयाची ठरत आहे. महामार्गाच्या मधोमध पडलेल्या या भेगेमुळे अनेक दुचाकी स्वार आतापर्यंत पडून जखमी झालेले आहे.accidents-cracked भेगेत अडकून दूचाकीवरून पडताक्षणी दुसर्या मोठ्या वाहनाने ठोकरल्यास जीवित्वाच्या हाणीची संभावना नाकारता येत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने या धोकादायक भेगेवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे. भेगाळलेल्या महामार्गा जवळच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेणार्या व दुचाकी चा वापर करणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ही भेग अधिकच धोकादायक बनत चालली आहे.