मुकाम उत्तराखंड; ३५० किल्ल्यांना नतमस्तक

कार्तिकसिंहने ८५ किल्ल्यांचे घेतले दर्शन

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
पुलगाव,
bowing-down-forts सायकलने फिरून गडकिल्ल्यांचे दर्शन घेणार्‍या उत्तराखंड मधील उद्यमसिंहनगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथील कार्तिक सिंह याचे पुलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. हॉटेल गौतम इन चे संचालक सुमित पडधारीया यांनी त्याच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली.
 

fort 
 
छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या दर्शनाची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण झाली. २४ डिसेंबर २०२४ ला आपण सायकलने घरून निघालो. भ्रमंती करत करत आतापर्यंत आपण ८४ किल्ल्यांचे दर्शन घेतले. ३५० किल्ल्यांना नतमस्तक होण्याचा मानस त्याने व्यत केला. उन्ह, थंडी व पावसामध्ये मजल, दरमजल करत सायकलने त्याचा प्रवास सुरू आहे. सायकलवर लावलेला भगवा झेंडा हाच आपला सोबती आहे.bowing-down-forts एका गावातून दुसर्‍या गावात जात असताना पुढील गावातील संपर्काची माहिती घेतो. छत्रपती शिवराय, भगवान श्रीराम व शिवशंकराचा जयजयकार करत मार्गक्रमण सुरू असल्याचे त्याने सांगितले. गावागावात भेटणार्‍या युवकांना तो एक नवी ऊर्जा या निमित्ताने प्रसारित करीत असतो. पुलगावात टिळक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.