तभा वृत्तसेवा
दारव्हा,
bribery-case-darvha : रेती व मुरुमाची वाहतूक करणाèयास कारवाईची धमकी देत 40 हजार रुपयांची लाच मागणाèया एका मंडळ अधिकाèयासह 3 तलाठ्यांना एसीबीच्या पथकाने 7500 रुपये घेताना अटक केली.
या प्रकरणात एका खाजगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवार, 24 जुलै रोजी दारव्हा तालुक्यातील बागवाडी गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या वाघाई मंदिर परिसरात केली.
आरोपी मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (वय 57, महागाव कसबा) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जय गणेश सोनोने (वय 26, हरू) पवन तानसेन भितकर (वय 30, पाळोदी), निलेश भास्कर तलवारे (वय 30, हातणी) आणि खाजगी इसम अशोक श्रावण रणखांब (वय 60) यांना अटक केली आहे.
यातील तक्रारदार मुरुम व रेती वाहतुकीचा व्यवसाय करतो. सोमवार, 21 जुलै रोजी दारव्हा येथे त्याचे ट्रॅक्टर पंक्चर झाल्याने तो थांबला असता, त्या ठिकाणी या आरोपींनी कारवाईची भीती दाखवून 40 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने रॉयल्टी पावती दाखवून विनंती केली, परंतु लाचखोर ऐकत नव्हते. म्हणून त्याने त्यांना 17 हजार रुपये त्यांना दिले. आरोपींनी उर्वरित रकमेसाठी पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, तक्रारदाराने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गुरुवार, 24 जुलैला 23 हजार रुपयांपैकी 7,500 रुपये स्वीकारत असताना पथकाने त्यांना अटक केली.