बाल नाट्य शिबीरातुन भविष्यातील मोठे कलाकार घडु शकतील: पद्मश्री नयना आपटे

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
PadmaShri Nayana Apte सध्याच्या काळात बाल नाट्य चळवळ सुरू ठेवण्यासाठी सगळीकडेच सुविधांचा अभाव आहे. मुंबईच्या बाहेर ही नाट्य चळवळ सुरू ठेवता येणे शय होईल काय या दृष्टीने बालकलाकारांना मार्गदर्शन करून त्या त्या गावातच नाट्य प्रयोग करावा व यातूनच तयार होणारे बालकलाकार भविष्यात मुंबई व मोठ्या शहरात काम करू शकतील. असे मार्गदर्शन पद्मश्री जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी केले.
 
 
PadmaShri Nayana Apte
 
बुलढाणा येथील डॉ. गजेंद्र निकम यांच्या मयूरकुंज सभागृहात येथे दि. २४ जुलै रोजी पालकांशी व बालकलाकारांची संवाद साधतांना व्यक्त केले याप्रसंगी माता अनुसया नाट्यसंस्थेचे निर्माते,दिग्दर्शक,लेखक प्रविण भारदे यांचेसह मयुरकंजचे डॉ गजेंद्र निकम यांची उपस्थिती होती. PadmaShri Nayana Apte रविवारी दि २७ जुलैला नयना आपटे व प्रविण भारदे यांचे कॉमेडी चेटकीण आणि मला आईबाबा हवेत ही बाल नाटकं गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता व सध्यांकाळी ७ वाजता असे दोनवेळा हे नाट्यप्रयोग सादर होणार आहे. जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी संवाद साधतांना बालनाट्यामधे व्यवसाय नसतो. बाल नाटक हे आवडीसाठी असते. आम्हाला हवे आहे म्हणून आम्ही ते करतो. लोकांना हवे आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही.
 
 
कदाचित आमची ही शेवटची पिढी आहे की जी बालनाट्यासाठी काम करत आहे. नाटक लोप पावू नये म्हणून हा खरा खटाटोप आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात अगदी गावोगावी बाल नाट्य कलाकार घडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्र बाहेरही या नाटकांचा हिंदी अनुवाद करून बालकलाकार तयार करण्याचा आमचा मानस आहे. PadmaShri Nayana Apte या माध्यमातून बाल नाटकासाठी रसिकही तयार करण्यासाठी असलेला हा एक प्रयत्न आहे. बुलढाण्यातील लहान मुलंही छान अभिनय करतात. अभिनयाचा पाया जर लहान वयातच पक्का झाला तर मोठी झाल्यावर ही मुलं खूप छान अभिनय करू शकतील. मग ती मुंबईकडे येऊन उद्याचे मोठे कलाकार पण बनवू शकतील. त्यांना तुम्ही रंगमंचावर काम करण्यासाठी प्रेरणा द्या असे मत बुलढाण्यातील बालनाट्य कलाकारांसाठी आयोजित नाट्य शिबीरार नाट्या शिबिरात मार्गदर्शन करतांना सुप्रसिध्द अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी व्यक्त केले.
 
 
या नाटकांमधे बुलढाण्यातील बालकलाकार दिव्यम सपकाळ, आयांश वानखेडे, गौरी मयुरे, देहजा जोशी, समर्थ देशपांडे, हिंदवी हरणखेडकर, PadmaShri Nayana Apte नुपूर परसे, ईशानी माळोदे, समायरा बाहेकर, अनन्या उदयकार, रिया पवार, संस्कृती कानडजे, स्वानंदी देशपांडे, इशिका टाकळखेडकर, शिवांजली शिंगणे, या बालकरांसोबतच पालक प्राची पिंपळे, पूजा हिवाळे, दिलीप सपकाळ, शशिकांत पवार हे देखील नाट्य अभिनय करणार आहेत.