फिटनेस मेनिया हेल्थ क्लबचे खेळाडू चमकले !

25 Jul 2025 13:30:58
नागपूर,
Fitness Mania Health Club नागपूरमध्ये झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत फिटनेस मेनिया हेल्थ क्लबच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. १०८ पेक्षा जास्त खेळाडूंमध्ये त्यांनी १३ पदकं जिंकली. १०८ हून अधिक स्पर्धकांमध्ये आपली ताकद सिद्ध करत या संघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.करण पागोरे आणि ऐश्वर्या चौधरी यांनी तीन-तीन सुवर्ण पदकं मिळवली. त्यांच्यासह अथर्व, चिन्मय, आर्या आणि श्रुती यांनीही सुवर्ण पदकं मिळवली. इतर अनेक खेळाडूंनी रौप्य (सिल्व्हर) आणि कांस्य (ब्राँझ) पदकं मिळवली.
 
 

fit 
 
 उल्लेखनीय यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे:
करण पागोरे – फुल पॉवर लिफ्ट गोल्ड, बेंच प्रेस गोल्ड, डेड लिफ्ट गोल्ड
ऐश्वर्या चौधरी – फुल पॉवर लिफ्ट गोल्ड, बेंच प्रेस गोल्ड, डेड लिफ्ट गोल्ड
अथर्व राऊत, चिन्मय घाटोळे, आर्या चौधरी, श्रुती वरखडे – प्रत्येकी गोल्ड
अंकुश बोटरे, चंद्रशेखर पाली, शिवम बघेल, अन्वय बहादूर – सिल्व्हर पदक विजेते
अक्षय काळे, आशिष बघेल, प्रिन्स अमगडे – ब्राँझ पदक विजेते शिवाय, शिवम विश्वकर्मा, प्रसन्न रंगारी, पार्थ उज्जैनकर व रुद्र भारती यांचाही स्पर्धेत सहभाग होता. या उत्तम कामगिरीमुळे अनेक खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी संधी मिळणार आहे, Fitness Mania Health Club ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.या यशामागे कोच . महेश गायकवाड यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनी प्रत्येक खेळाडूला योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले.जिमचे संचालक युवराज पागोरे व सुरेखा पागोरे यांनी सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
सौजन्य:सुनील गव्हाणे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0