कारंजात गॅसची रिफिलिंग; १७ सिलिंडर जप्त

25 Jul 2025 21:23:37
कारंजा (घा.),
Gas refilling at the fountain एका गॅस सिलिंडरमधील गॅस थेट दुसर्‍या सिलिंडरमध्ये भरण्याचा गोरख धंदा कारंजा शहरात सुरू होता. त्या सिलिंडरची चढ्या दराने विक्रीही करीत होती. हा धकादायक प्रकार तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर उजेडात आला. या कारवाईत तब्बल १७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तसेच काळाबाजार करणार्‍यावर कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
Gas
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वार्ड ६ परिसरात अजय पटले याच्याकडे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर असून तो गॅसचा काळाबाजार करीत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांना मिळाली. तहसीलदार डॉ. मोहने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षण अधिकारी भूषण राऊत, सोनाली रेवाडे, पोलिस उपनिरीक्षक गिरधर पेंदोर यांच्या चमूने अजय पटले याचे निवासस्थान गाठले. Gas refilling at the fountain अधिकार्‍यांनी घर परिसराची पाहणी केली असता गॅसची रिफिलिंग केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. नेमका हा प्रकार काय याबाबतची माहिती अजय पटले याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. अजय पटले करीत असलेला प्रकार जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ चा उल्लंघन करणारा असल्याने त्याला अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. त्याच्या घरातून १७ गॅस सिलिंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेले हे सिलिंडर संभाव्य धोका लक्षात घेता कारंजा येथील इंडियन गॅसच्या अधिकृत एजन्सीधारकाला सूपूर्द करण्यात आले. अजय पटले याच्याविरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0