लोकनायक बापूजी अणे विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

25 Jul 2025 15:37:49
तभा वृत्तसेवा
Lok Nayak Bapuji Ane Vidyalaya लोकनायक बापूजी अणे विद्यालयात वर्ग 5 ते 7 साठी 25 जुलै रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे उपस्थित होते. एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजय राऊत व कार्यकारिणी सदस्य विवेकजी धर्माधिकारी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापक छाया पांडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मीकांत केळापुरे व शाळेचे पर्यवेक्षक सचिन देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.
 

Lok Nayak Bapuji Ane Vidyalaya  
या पालक सभेत पालक प्रतिनिधीची ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. वर्ग 5 ते 7 मधून गजानन नेवारे, हरीश टागोर, अलका सोनवणे, प्रशांत निकोडे, अश्विनी राऊत, अमोल मोहरकर, जया सपकाळ, अविनाश राऊत, पूनम कोंदरे या पालकांची पालक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. सोबतच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी शितल राजेश गुबे यांची ईश्वर चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक छया पांडे यांनी तसेच उपमुख्याध्यापक लक्ष्मीकांत केळापुरे यांनी शाळेविषयी माहिती, तर परीक्षा पद्धती विषयी अमित तिखिले यांनी पालकांना माहिती दिली.पालक सभेला वर्ग 5 ते 7 ते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही पालकांनी शाळेविषयी सकारात्मक विचार व्यक्त केले. आपल्या शंकांचे निरसन शाळेच्या वतीने तसेच एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाèयांच्या वतीने करण्यात येईल, अशी खात्री दिली.
 
कार्यक्रमाचे संचालन प्रतिमा पिंपळकर व आभारप्रदर्शन संजीवनी भगत यांनी केले. या कार्यक्रमाचा प्रभार शाळेतील शिक्षिका प्रतिमा पिंपळकर, सुरेखा तडसे, संजीवनी भगत, सुमित अतकुलवार या शिक्षकांकडे होता. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व कर्मचाèयांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0