भारी येथे महाराजस्व समाधान शिबिर

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Maharajswa Samadhan Camp छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 23 जुलै रोजी तालुक्यातील भारी येथील राममंदिर परिसरात उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 

Maharajswa Samadhan Camp 
या शिबिरात प्रामुख्याने तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात प्रामुख्याने भारी येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागामार्फत सातबारा, फेरफार, जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, राष्ट्रीयत्व प्रमाणात, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल हे दाखले वाटप करण्यात आले. आधारकार्ड अपडेट करण्यात आले तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत सर्व माहिती लाभार्थ्याना देण्यात आली.
पंचायत समितीमार्फत जॉबकार्ड, उमेद महिलाबचत गटामार्फत महिलांना विविध विषयाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. कृषी विभागामार्फत पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत नोंदणी करण्यात आली. किसान क्रेडिट कार्डची माहिती व नोंदणी करण्यात आली.
आरोग्य विभागामार्फत सिकलसेल व आरोग्यविषयक सर्व तपासण्या करून प्राथमिक औषध उपचार व योग्य सल्ला देण्यात आला. अभियानासाठी गटविकास अधिकारी मडावी, भारी सरपंच ज्योती मरसकोल्हे, पोलिस पाटील विशाल नगराळे, मंडळ अधिकारी बेदरे, अक्कलवार मंडळ अधिकारी लोहारा व मोहा, गजानन गायकवाड, महेश चौधरी, अनिल गावंडे, पुरुषोत्तम चव्हाण, प्रवीण डेरे, अमित चौधरी, काजल नगराळे, प्रिया बान्ते, जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक गुल्हाने, शिक्षक वृंद, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक अनिता वèहाडे व सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने लाभार्थी हजर होते. शिबिरात विविध प्रकारचे एकूण 392 दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी ग्राम महसूल अधिकारी दीपाली आंबेकर व ग्राम महसूल अधिकारी सोनाली सातारकर यांनी परीश्रम घेतले.