वर्धा,
Agnihotri College आईने दिलेल्या संदेशाने आपण शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. तिच्याच स्मृतिदिनी गेल्या अनेक वर्षांपासुन गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. या सत्कारातून विद्यार्थ्यांना उर्जा मिळते. जय महाकाली शिक्षण संस्था व अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सच्या वतीने बुधवार २६ रोजी सकाळी १०.३० वाजता अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर सभागृहात मातोश्री स्व. राणीबाई अग्निहोत्री यांच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारोहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आज २५ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयात शिकलेले हजारो विद्यार्थी देश विदेशात नोकरीकरिता गेले आहेत. त्यांना अजुनही महाविद्यालयाची आठवण येते. विद्यार्थी मेहनत घेऊन अभ्यास करतात. त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. Agnihotri College कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे माजी पोलिस आयुत नागपूर डॉ. भुषणकुमार उपाध्याय राहतील तर विशेष अतिथी म्हणून नागपूर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आनंद परचुरे, रा.तू.म. नागपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे, नागपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ संदीप शास्त्री यांची उपस्थिती राहील तर अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री राहतील. या कार्यक्रमात संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवन्वित करण्यात येणार आहे.
गुणगौरव सोहळ्यात सुवर्णपदक प्राप्त, गुणवत्ता प्राप्त तसेच विदेशात जसे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान, या सारख्या प्रगत देशात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व देशाचा स्वाभिमान उंचावणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंकरप्रसाद अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा विद्यार्थी कृष्णा राठोड, पुर्णिंदु सरकार, फार्मसीचा करण निखाडे, यश डेहनीकर, ट्विंकल मसराम, Agnihotri College शुभांगी चव्हाण, गायत्री आवारे, कॉलेज ऑफ लॉ मधून किरण ठाकरे, राजेश हेडाउ, राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड मॅनेजमेंटमधून नवीन आहूजा, पायल चव्हाण, राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील किशन सिंग, लक्ष्मण भादू, अग्निहोत्री स्कूल ऑफ टेनॉलॉजी मधून नंदिनी राठोड, पॉलिटेनिक नागठाना येथील विवेक राऊत, गांधीसिटी पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजची नेत्राली महाजन, पॉलिटेनिक पुलगाव मधून दीक्षा कुमारी गांधी सिटी पब्लिक स्कूल पुलगाव मधून वेदांत तिवरे, गांधी सिटी पब्लिक स्कूल, रामनगर येथील जीत पिंपळकर, राणीबाई अग्निहोत्री विद्यालय पवनूर येथील जान्हवी कावटे, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल मधून कांचन पांडे, तन्मय वावरे, गांधीसिटी पब्लिक स्कूल विंग ए मधून शर्वरी दांदडे, आदींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.