नागपूर,
pavitra-portal-teacher-recruitment : विविध शाळांमधील तसेच पवित्र पोर्टल प्रणालीअंतर्गत नवीन शिक्षकांच्या भरतीसाठी मुलाखतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे बèयाच कालावधीपासून शिक्षकांच्या अपुèया संख्येमुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागणाèया विद्यार्थ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद तसेच शासकीय शाळांमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजीचे विषय शिक्षक उपलब्ध नव्हते. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असल्याचे चित्र होते. मागील महिन्यात जिल्हा परिषदेत शाळांमधील शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध झाली. तसेच या महिन्यात खाजगी संस्थांमधील अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित जागांवरील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर संस्थांना प्राप्त झालेल्या निवड यादीबरोबर मुलाखतींची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.
या आठवड्यात अनेक संस्थांनी आपल्या शाळांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ई-मेल तसेच व्हॉट्सअॅपद्वारे मुलाखतीचे पत्र पाठवून वेळ, तारीख आणि वार निश्चित केलेला आहे. अनेक उमेदवारांना मुलाखतीसह आपल्या विषयाच्या संपूर्ण तयारीस हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. मुलाखतीसोबत त्यांना पडताळणीसाठी सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणावयाच्या आहेत. अनेक उमेदवार मुलाखतीसाठी बाहेरच्या जिल्ह्यांमधून येणार आहेत. शाळांमध्ये नव्याने शिक्षक भरती होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर होणार आहे.
गणित, विज्ञानाचे शिक्षक मिळणार
अनेक शाळांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रियेतून गणित तसेच विज्ञानाच्या शिक्षकांची नेमणूक झाल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.