साईकृपा गेम पार्लर व वरली मटका जुगार अड्ड्यावर छापा

१२.४२ लाखाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
raid-worli येथील अशोक परळीकर यांचे पक्के टिनशेडमध्ये सुरु असलेल्या अवैध वरली मटका व साईकृपा गेम पार्लरमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगारावर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या पथकाने कारवाई करुन १२ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.
 

raid 
 
 
याबाबत सविस्तर असे की, उपविभागीय पोलिस अधिकारी वाशीम यांना गुप्त माहिती मिळाली की, विर भगतसिंग चौक मंगरुळनाथ येथे अशोक परळीकर यांचे पक्के टिनशेड मध्ये अवैधरित्या वरली मटका व साईकृपा गेम पार्लरमध्ये अवैध जुगार सुरू आहे. त्यावरुन छापा टाकला असता त्याठिकाणी १४ जण हे टाईम ओपन, मिलन नावाचे जुगारावर पैश्याने हारजितने तसेच व्हिडीओ गेम पैश्याचे हारजितने खेळतांना मिळून आले. तसेच अशोक परळीकर यांचे राजधानी गेस्ट हाऊसमध्ये सुध्दा रेड केली असता त्याठिकाणी ४ इसम हे व्हिडीओ गेम पैश्याचे हारजितने खेळतांना मिळून आले. व्हिडीओ गेम केवळ मनोरंजनाकरीता असतांना सदर ठिकाणी ग्राहकांना पैश्याचे बदल्यात त्यांना जिंकलेले पैशाचे बदल्यात क्वॉईन देवून व ग्राहक हे गेम जिंकल्यास त्यांना जिंकलेले पैसे देवून याप्रमाणे पैश्याचे हारजितने जुगार खेळतांना मिळून आले.raid-worli तसेच त्याठिकाणी परवाना नुतनीकरण केलेला नसल्याचे दिसून आले.
सदर कार्यवाहीमध्ये घटनास्थळावरुन रोख ५०,८०० रुपये, १२ मोबाईल कि. १ लाख ३८ हजार ५००, वरली मटका लावण्यााची डॉलर मशीन किंमत २२ हजार रुपये, ३ मोटर सायकल किंमत १ लाख ९५ हजार रुपये, वरली मटयाच्या चिठ्ठ्या, हिशोबाचे रजिस्टर पॅड, कॅलयुलेटर किंमत २०० रुपये, २३ व्हिडीओ गेम मशिन किंमत ८ लाख ५ हजार रुपये, ओकाया कंपनीचे २ इन्वर्टर बॅटरी व इन्वर्टर किंमत ३१ हजार रुपये, पांढर्‍या व पिवळ्या धातुचे कॉईन असा एकूण १२ लाख ४२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.
याप्रकरणी नामदेव उमाळे, सुमित माहोरे, महादेव कव्हर, पवन खाडे, योगेश बंगाळे, विजय दावडा, विनोद वर्मा, रमजान परसुवाले, संतोष वानखेडे, हनिफ शेख, सागर डिगांबर लुंगे, अशोक परळीकर, भागवत लांभाडे, शेख जावेद शेख सत्तार, रहीम तुकडीया नानगीवाले, गणेश मोरे या आरोपीवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल, सपोनि दिनेश शिरेकार, पोहेकॉ हरिभाऊ कालापाड, पोहेकॉ अरविंद राठोड, पोकॉ स्वप्नील शेळके, पोकॉ नितीन चोपडे, पोकॉ गणेश बाजड, पोकॉ मळघणे यांच्या पथकाने केली.