वर्धा-कळंब रेल्वेची ऑटोला धडक; ३ जखमी... धावाधाव

25 Jul 2025 21:17:41
वर्धा,
train hits auto वर्धा देवळी रेल्वे मार्गावर देवळी कळंब रेल्वेने ऑटोचा अपघात झाला... तीन प्रवासी जखमी झाल्याचा संदेश वर्धा रेल्वे प्रशासनाकडे धडकला... मिनिटा मिनिटात आपातकालिन यंत्रणा सज्ज होत होती... घटनेचा निरोप मिळाल्यानंतर अवघ्या ७ मिनिटात वर्धा रेल्वे स्थानकातून अधिकारी, कर्मचारी घटनास्थळाकडे रवाना झाले... काय झाले याची चौकशी सुरू झाली... आपातकालीन यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली... घटनाही वार्‍यासारखी पसरली... पण, ती अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कार्यसिद्धतेची नियमित मॉक ड्रील असल्याचे शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आले.
 
 
train hits auto
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार २५ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वर्धा-कळंब पॅसेंजर (गाडी क्र. ५१११९) वर्धाहून कळंबकडे जात असताना रेल्वे गेट उघडे असल्यामुळे एक ऑटो रिक्षा फाटक ओलांडताना ट्रेनला धडकली. या धडकेत २ ते ३ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. train hits auto १२ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळताच १२ वाजून ५७ मिनिटांनी सर्व वरिष्ठ अधिकारी नियंत्रण कक्षात पोहोचले. १२ वाजून ५८ मिनिटांनी वर्धा येथून तात्काळ मदत गाडी, रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले.
 
 
सहाय्यक संचालन व्यवस्थापक (जनरल), सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक मंडल सुरक्षा अधिकार्‍यांनाही घटनास्थळी रवाना करण्यात आले. १ वाजून ३० मिनिटांनी सहाय्यक मंडळ सुरक्षा अधिकार्‍यांनी ही घटना मॉक ड्रिल म्हणून घोषित केली. मंडळ रेल्वे प्रबंधक नागपूर विनायक गर्ग आणि मंडल सुरक्षा अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा—देवळी रेल्वे मार्गात मॉक ड्रिल करण्यात आली. train hits auto या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कर्मचार्‍यांची तत्परता, समन्वय आणि कार्यक्षमता तपासणे हा होता. काल्पनिक घटनेनुसार, या मॉक ड्रिलमध्ये रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याची तयारी दाखवली.
Powered By Sangraha 9.0