वर्धेत भाजपाची उद्या विदर्भ बैठक

भाजपा जिल्हाध्यक्ष गाते यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :26-Jul-2025
Total Views |
वर्धा,
BJP's Vidarbha meeting भारतीय जनता पार्टीची विदर्भातील लोकप्रतिनिधींची बैठक सेवाग्राम मार्गावरील चरखा भवन येथे सोमवार २८ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ७५३ पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली. भाजपाच्या धंतोली येथील जिल्हा कार्यालयात आज २६ रोजी आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रदेश सचिव सरिता गाखरे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा गुंड्डू कावळे, महामंत्री अर्चना वानखेडे, प्रशांत बुर्ले, शहर अध्यक्ष निलेश किटे यांची उपस्थिती होती.
 
 
BJP
 
गाते पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विदर्भातील नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधीर मुनगंटीवार, ना. अशोक उईके, ना. आकाश फुंडकर, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, हंसराज अहीर, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह ७५३ पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे गाते यांनी सांगितले. BJP's Vidarbha meeting वर्धेत विदर्भातील भाजपा पदाधिकार्‍यांची होणारी ही वर्धेच पहिलीच बैठक ठरणार आहे. या बैठकीला विदर्भातील आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आजी माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आदींही उपस्थिती राहणार आहे. बैठक यशस्वी करण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. यात व्यवस्था प्रमुख म्हणून संजय गाते, सुनील गफाट आहेत तर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे हे व्यवस्थापन समितीत आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाला की समारोपाला उपस्थित राहतील, असे अद्याप ठरलेले नसल्याचे गाते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.