सेलू,
Deepchand Vidyalaya दैनिक तरुण भारतने आपल्या शताब्धी वर्षात पर्यावरणपुरक अभियान हाती घेतले आहे. यातील तुळशी हा सर्वात महत्त्वाचा विषय तरुण भारतने हाती घेतला. आज झाडांचे महत्त्व सांगण्याची गरज का पडते हा प्रश्न उपस्थित होतो. ताजमहाल प्रदूषणाने खराब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तज्ज्ञांनीच ताज महालच्या परिसरात तुळस लावण्याचा सल्ला दिला. तुळशीला धार्मिक महत्त्व आहे यासोबतच बहुगुणी वनस्पती असल्याचे मार्गदर्शन वर्धेतील वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष, राज्यातील पहिल्या ऑसिजन पार्कचे निर्माते व प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी केले.
दीपचंद विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दैनिक तरुण भारतची शताब्दी आणि श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज २९ रोजी दीपचंद विद्यालयात तुळशी दान कार्यक्रमात ते मुख्य वता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी तरुण भारतचे व्यवस्थापक विवेक तरासे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपचंद विद्यालयाचे अध्यक्ष नवीन चौधरी, संचालक व प्रसिद्ध उद्योजक शैलेंद्र दफ्तरी, नरेंद्र सारस्वत, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, प्राचार्य पोहाणे, उपप्राचार्य डॉ. मकरंदे, धर्म जागरणचे विदर्भ संयोजक अजय कुलासपूरकर, नारी शती महिला संघटनेच्या तालुका संयोजक वैशाली केळझरकर, व्ही. एम. चांदेकर, जी. बी. खंडागळे यांची उपस्थिती होती.
डॉ. पावडे पुढे म्हणाले, आम्ही प्रगल्भ झालो, सुसंस्कृत झालो. मात्र, निसर्गाविषयीची आमची आस्ता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. झाडं ऑसिजन देतं आणि रेनवॉटर हार्वेस्टिकचेही काम करते. झाडांवाटे जाणारं पाणी थेट माती मुरतं. निसर्ग, झाडं हे आमच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. जिथे वृदांवन असतं तिथे स्मशान नसतं. आपल्याकडे पाणी, नारळ, तोरण, केळीचे खांब पुजेत वापरले जातात. त्यामागे एक संस्कार होते. ती निसर्गाची पूजा होती. नवीन पिढीवर आता वृक्ष संस्कार होणे गरजेचे आहे. ते काम तरुण भारतने हाती घेतले. निसर्ग आपली काळजी घेतो. पण, तो थकतो आहे. तो दाता आहे. जमिनीचे प्रदूषण वाचवण्यासाठी आपल्याला सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहेे. आपल्या पुर्वजांनी तुळशीचे महत्त्व समजून घेतले होते. त्याला धार्मिक भावनांशी जोडले. वृक्षारोपण हा विषय आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. आपण माणूस म्हणून जगाताना निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तरुण भारतने यापूर्वी बिज अंकुरे अंकुरे अभियानातून बियांचे वाटप केले नंतर वटवृक्षही वाटले आता तुळशी लावण्यासाठी मोहीम हाती घेतली. अन्य संस्थांनीही असे उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे डॉ. सचिन पावडे म्हणाले.
विवेक तरासे यांनी तरुण भारतची समृद्ध परंपरा सांगितली. तरुण भारतने सामाजिक बांधिलकेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरात तुळशीबाग प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी तुळशीची बाग होती. अशीच बाग तरुण भारतच्या या अभिनव उपक्रमातून तयार करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपचंद विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या.
संस्थाध्यक्ष नवीन चौधरी यांनी आमच्या शाळेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आपण स्वत: झाडांविषयी अतिशय संवेदनशील आहोत. गेल्या दीड वर्षात आपण आपल्या शेतात स्वत: विविध प्रकारची झाडं मोठी केली असल्याचे सांगितले. आमच्या शाळेत तुळशी दान करा हे अभियान तरुण भारतने घेतले. भविष्यातही तरुण भारतच्या सामाजिक उपक्रमात आमचा सहभाग राहिल, असे आश्वासन दिले. प्रफुल्ल व्यास यांनी तरुण भारतच्या उपक्रमाची माहिती देत जिल्ह्यात मंदिर स्वच्छता व तुळशी लावा या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
संचालन एम. बी. हांडे यांनी केले. आभार उप प्राचार्य डॉ. मकरंदे यांनी मानले. तर यशस्वीतेकरिता जे. व्ही. लोंढे, एस. जी. तेलरांधे, जे. एस. फटींग व पि. व्ही. चव्हाण यांनी परिश्रम घेतले.