नागपूर,
Dr. Babasaheb Ambedkar College डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथील विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून महाविद्यालयाचा व परिसराचा गौरव वाढविला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, निष्ठा व शैक्षणिक गुणवत्ता आहे.चारुल विटाळकर आणि वचन पटेल यांनी ३०० हून अधिक गुण मिळवत विशेष गुणवत्तेसह परीक्षा उत्तीर्ण केली. ही कामगिरी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.गुरुदेव पांडे – २७८ गुण,वेदांत अवधूत – २७७ गुण ,खुशी भाके – २७२ गुण ,रुचिका बाकरे – २४८ गुण,प्रियांशी नरवरिया – २४४ गुण,प्रियांशी नरवरिया २४४ गुण,जान्हवी मेश्राम – २४० गुण, जान्हवी पाडवे – २२६ गुण,पार्थ निपाणे – २२५ गुण, ईशिका उमाठे – २२१ गुण ,वंश रोहिले – २१० गुण ,युग बैस या विद्यार्थ्यांनी देखील उल्लेखनीय यश संपादन केले आहे:

ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या चिकाटीचे आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे महाविद्यालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. Dr. Babasaheb Ambedkar Collegeया यशाबद्दल आदरणीय भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, अध्यक्ष, दीक्षाभूमी स्मारक समिती; डॉ. सुधीर फूलझेले, सचिव; तसेच सर्व सन्माननीय व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्या डॉ. दीपा वाय. पान्हेकर, उपप्राचार्या श्रीमती हर्षा बोरकर, श्री विकास सिडाम, विभाग प्रमुख, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य :प्रफुल ब्राम्हणे,संपर्क मित्र