नागपूर,
Finance Minister Nirmala Sitharaman नागपूरचे आयकर आयुक्त आणि 2004 बॅचचे आयआरएस अधिकारी संदीपकुमार साळुंखे यांना आयकर विभागाचा सर्वोच्च “उत्कृष्ट सेवा पदक” प्रदान करण्यात आला. २४ जुलै २०२५ रोजी दिल्लीत पार पडलेल्या १६६ व्या आयकर दिन सोहळ्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
देशभरातील केवळ १० अधिकाऱ्यांना हा बहुमान मिळाला असून, साळुंखे यांची निवड त्यांच्या २१ वर्षांच्या उत्कृष्ट कर प्रशासन, जलसंधारण क्षेत्रातील ‘रूट’ चळवळ, आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन व साहित्य लेखन यामुळे झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात जलसंधारणाच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, तर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली पुस्तके – हम होंगे कामयाब, अंतरीचा दिवा, इ. लोकप्रिय ठरली आहेत. Finance Minister Nirmala Sitharamanसाळुंखे यांना यापूर्वीही ‘राष्ट्रीय जलप्रहरी पुरस्कार’ मिळाला असून, प्रशासन आणि सामाजिक बांधिलकी यांचा आदर्श संगम साधणारे अधिकारी म्हणून त्यांचं काम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र