सिरोंच्यात शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    दिनांक :26-Jul-2025
Total Views |
सिरोंचा,
join-ncp-in-sironcha गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) बळकटीसाठी मोठी घटना शुक्रवारी घडली. तालुक्याच्या दौर्‍यावर आलेले आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तालुक्यात नवचैतन्य निर्माण केले.
 
 
 
सिरोंचा
 
या पक्षप्रवेशात सिरकोंडा, मादाराम, विठ्ठलरावपेठा, मोयाबिनपेठा, बेज्जुरपल्ली, बामणी यासारख्या गावांतील सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांतील माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार डॉ. आत्राम यांनी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे पक्षाचे अधिकृत घडी चिन्ह असलेले दुपट्टे टाकून स्वागत केले. याप्रसंगी बोलताना आमदार आत्राम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकरी, गरिब, आदिवासी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणारा पक्ष आहे.join-ncp-in-sironcha या पक्षात येणार्‍या नव्या कार्यकर्त्यांमुळे आमची ताकद निश्‍चितच वाढली असल्याचे ते म्हणाले. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोलूरी, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचर्लावार, जगदीश रालाबंडीवार, सत्यनारायण परपटला, सत्यम पिडगू, जूगनू शेख, सय्यद सालार, ओमप्रकाश ताटीकोंडावार, पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार तसेच इतर अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.