"अभया" हस्तलिखिताचा पाचवा वर्षपूर्ती अंक प्रकाशित

    दिनांक :26-Jul-2025
Total Views |
नागपूर ,
Maitreya Branch Sonegaon राष्ट्रसेविका समितीच्या महादेवी शाखा (सहकार नगर) आणि मैत्रेय शाखा (सोनेगाव) यांच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेले "अभया" हस्तलिखित यावर्षी पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. कार्यकर्ता संघटनेचा आधार व नागरिक धर्माचे पालन या विषयांवर आधारित हस्तलिखिताचे विमोचन कवयित्री स्वाती सुरंगळीकर यांच्या हस्ते झाले याप्रसंगी स्वाती यांनी आपली दिलखुलास’ ही मनस्पर्शी कविता 'अभया'ला अर्पण केली.प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या विदर्भ प्रांत व्यवस्था प्रमुख मृणाल पानसे उपस्थित होत्या.
 
 

shakha 
 
कार्यक्रमाला विदर्भ प्रांत व्यवस्था प्रमुख मृणाल पानसे आणि शुभांगी भडभडे यांची विशेष उपस्थिती लाभली. स्वाती यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी, Maitreya Branch Sonegaon  गीतांच्या ओळी, वंदनीय मावशी केळकर यांचे स्मरण करत उपस्थितांना भारावून टाकले. त्यांनी स्वतःची ‘दिलखुलास’ कविता ‘अभया’ला अर्पण केली.अंकात लेख, सजावट, प्रश्नमंजुषा, चित्रे आदींचा सुंदर समावेश असून संपादन आरती देव, मयुराक्षी क्षीरसागर, आणि. सुनीती काळे यांनी केले.चित्रांकनात योगदान शिल्पा लाभे-कुळकर्णी,सरिता गोखले, मुक्ता कपले यांचे होते.
 
सौजन्य: स्वाती सुरंगळीकर,संपर्क मित्र