नागपूर,
mankapur-shiva-temple : लोटस कल्चरल अँड स्पॉटिंग असोसिएशनने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या समन्वयाने मानकापूर येथील प्राचीन शिव मंदिर परिसरात ७१ लाख मातीचे शिवलिंग तयार करण्याच्या संकल्प आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शिवभक्तांनी गंगा नदीच्या काठावरील मातीतून १लाख ४३ हजार ७८० मातीचे शिवलिंग तयार करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दयाशंकर तिवारी, आशा तिवारी, कृपाशंकर तिवारी, गायत्री तिवारी यांच्या हस्ते रुद्राभिषेक करून मातीच्या शिवलिंगाची पूजा करण्यात आली. अभिषेक झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी मातीचे शिवलिंग तयार केले. शिवलिंग तयार करताना संजीवनी गायत्री मंत्राचा जप सतत चालू होता. भक्तीमय वातावरणात शिवभक्तांची वर्दळ सायंकाळपर्यंत कायम होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण मातीचे शिवलिंग तयार करीत होते.
हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत होता. भाविकांनी तयार केलेल्या सर्व मातीच्या शिवलिंगांवर अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस विष्णू चांगदे, रितेश गावंडे, किशन गावंडे, अर्चना पाठक उपस्थिती होती. अभिषेक, पूजा आणि आरतीनंतर, सर्व मातीच्या मूर्तीचे त्याच ठिकाणी बांधलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जित करण्यात आल्या. सर्वच भाविकांनी त्यांच्या हातांनी बनवलेल्या शिवलिंगांचे विसर्जन केले. या संकल्पाच्या यशस्वीतेसाठी दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, मनोज सिंह, अमर खोडे, शशिकांत हरदे, अमित मिश्रा, प्रीती कश्यप, मनोज पांडे, प्रशांत गुप्ता आदी परिश्रम घेत संकल्प कार्यक्रम २४ ऑगस्टपर्यंत अखंडपणे सुरू राहणार असल्याने सर्व शिव भक्तांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.