वणा नागरीकला पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार दुसर्‍यांदा

    दिनांक :26-Jul-2025
Total Views |
हिंगणघाट,
vana-nagari विदर्भामधील अग्रगण्य अशा वणा नागरीक सहकारी बँकेला आर्थिक वर्षे २०२३-२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र स्टेट को-ऑप बैंकर असोसिएशन लि.चा नागपूर विभागामधून २०० ते २५० कोटी ठेवी असलेल्या बँकेमधून पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार वणा बँकेला दुसर्‍यादा प्राप्त झाला, हे उल्लेखनिय!
२३ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, सारस्वत को-ऑप बँक मुंबईचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
 

वन बँक  
 
 
३१ मार्च २०२४ रोजी बँकेजवळ ५८९ लाख भाग भांडवल, ठेवी २४८ कोटी तर कर्जवाटप १७२ कोटी आणि गुंतवणूक ९१ कोटी तर निव्वळ नफा हा ५०२ लाख झाला होता. बँकेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी बँकेला पद्म भुषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत आहे कारण पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक आगळेवेगळे निर्णायक वळण दिले असून ते विकास साधणारे नेते होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगती, मुलींना मोफत शिक्षण, मुत विद्यापिठाची स्थापना तसेच ते क्रांतिकारक, स्वातंत्रसैनिक व विधायक कार्य करणारे प्रभावी मुख्यमंत्री होते अशा या महान नेत्याच्या नावाचा पुरस्कार आमच्या बँकेला सलग दोन वर्षे मिळणे हे माझे व सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांच्यासाठी गौरव असल्याचे अ‍ॅड. कोठारी म्हणाले. बँकेला मिळालेल्या या पुरस्काबद्दल अ‍ॅड, सुधीर कोठारी, संचालक डॉ. निर्मेश कोठारी, सुरेश सायंकार, ओमप्रकाश डालीया, डॉ. दिलीय जोबनपुत्रा, हिंम्मत चतुर, विपीन पटेल, अक्षय ओस्तवाल, सुरेश नैतानी, अविनाश गांधी, डॉ. वरूण लोढा, मनिष चितलांगे, ज्ञानेश्वरराव लोणारे, सिद्धार्थ दारूंडे, विद्या भोयर, पुनम बादले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.