हिंगणघाट,
Sameer Kunawar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘निरामय हिंगणघाट’ या अभियानांतर्गत हिंगणघाट येथे मोतिबिंदू मुत तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४ हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी होऊन अनेकांना मोफत वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हिंगणघाट तालुका मोतीबिंदू विरहित करायचा असल्याचा संकल्प आ. समिर कुणावार यांनी केला.
शिबिरांतर्गत डोळ्यांची तपासणी, मोतिबिंदूचे निदान, शस्त्रक्रियेची निवड, तसेच विविध आरोग्य सेवा सुसज्ज वैद्यकीय पथकाद्वारे प्रदान करण्यात आल्या. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन प्राथमिक तपासणी करून नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रेरित केल्यामुळे आरोग्य सेवा प्रत्यक्ष घरपोच झाली.
या उपक्रमाची संकल्पना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची होती. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आ. समीर कुणावार यांनी विशेष पुढाकार घेतला.
या आरोग्य शिबिराच्या अनुषंगाने पाचवी ते दहावीमध्ये शिकणार्या दिव्यांग विद्यार्थिनींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने किसान विकास पत्र योजनेंतर्गत प्रत्येकीला २५ हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाला ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शिबिरादरम्यान पावसाची आकस्मिक हजेरी असतानाही नागरिकांचा उत्साह कुठेच कमी झाला नाही. आरोग्याची काळजी घेण्याचा जणू जनतेने निर्धारच केला होता.
महाआरोग्य शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीत उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, गटविकास अधिकारी महेश बेहेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल भोयर, समितीचे जिल्हा समन्वयक निलेश पोहेकर, तालुका समन्वयक तथा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, अजय लिडबे, डॉ. धकाते, ठाणेदार देवेंद्र ठाकूर, छाया सातपुते, अंकुश ठाकुर, तुषार आंबटकर परिश्रम घेतले.