वर्धा,
st-bus-and-truck-collide वर्धा जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोञा चौरस्त्याजवळ एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात एसटी बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, वर्धा येथून हिंगणघाटकडे निघालेली एसटी बस धोञा चौरस्त्याजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी परिसरात पावसाची संततधार सुरू होती. पावसामुळे रस्ता ओला झाल्याने ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.st-bus-and-truck-collide त्यांनी जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे वर्धा-हिंगणघाट मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. ट्रकचालकाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.