ग्रामपंचायत दर्जा नसलेल्या गावाचे प्रस्ताव सादर करा : जितेंद्र महाराज
तांड्याला ग्रामपंचायत दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
दिनांक :26-Jul-2025
Total Views |
मानोरा,
jitendra-maharaj ज्या तांड्याची लोकसंख्या ७०० आहे, अशा गावाला ग्रामपंचायतचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढले असून, वाशीम जिल्ह्यातील ज्या तांड्याला ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला नाही अशा तांड्याना ग्रामपंचायत दर्जा मिळण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आपल्या तांड्याचे प्रस्ताव विना विलंब सादर करावे, असे आवाहन संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे राज्य प्रमुख जितेंद्र महाराज यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदमध्ये बोलतांना महाराज म्हणाले की, राज्याची निवडणूक लागण्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत प्रमुख महंत याची बैठक पार पडली. यावेळी समाजाचे ज्वलंत प्रश्न सोडविणे, राज्यात वास्तव्यास असलेला समाज तांड्यात राहतो तांड्यावर सुविधा व ग्रामपंचायत दर्जा देण्या बाबत सहमती दर्शविली. त्यानुसार मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दला जागले.jitendra-maharaj लातूर जिल्ह्यातील कानडी बोरगाव व सेवादास नगर तांड्याला ग्रामपंचायत दर्जा बहाल करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातील ज्या तांड्याला ग्रामपंचायत दर्जा अजून मिळाला नाही, असे तांड्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करावे. जेणे करून जी गावे गट ग्रामपंचायत मध्ये असेल त्या तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळेल. पत्रकार परिषदेला मधुकर राठोड उपस्थित होते.