वर्धा,
yade-rafi-sursangam स्थानिक साहित्य कला शोधक मंचच्या वतीने वादे रफी फिल्मी गीत गायन स्पर्धा रविवार, ३ ऑगस्ट रोजी स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे आयोजित केली आहे. स्पर्धेत १५ ते ४० वर्षे वयोगटातील गायक-गायिकांना भाग घेता येईल. या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणार्या स्पर्धकांनी प्रथम फेरीकरिता आपल्या आवडीच्या कोणत्याही तीन गायकांची गाणी तयार करुन यावे.
त्यामधुन परीक्षक सुचवतील त्या गाण्याचा मुखडा व एक अंतरा सादर करावा लागेल. सादर करावयाचे गाणे हिंदी किंवा मराठी चित्रपटातील असावे. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम २ ऑगस्ट आले आहे. या स्पर्धेत ७९ हजार रुपयांची रोख पारितोषिकं, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम फेरी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होईल. अंतिम फेरी त्याच दिवशी सायकाळी ६ वाजता घेण्यात येईल.yade-rafi-sursangam अधिक माहितीकरिता स्पर्धा प्रमुख दिलीप मेने, सचिव प्रभाकर उगेमुगे यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथम पुरस्कार २१००१ रुपये, द्वितीय पुरस्कार १५००१ रुपये, तृतीय पुरस्कार १०००१ रुपये तर प्रोत्साहनपर पुरस्कार १० प्रत्येकी २१०१ रुपये देण्यात यशेणार आहेत. सर्व संगीत प्रेमींनी विदर्भातील नवोदीत प्रतिभाशाली गायक, गायिकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.