वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम

27 Jul 2025 19:03:11
नागपूर,
IAS officer Asha Pathan महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा त्रिमूर्ती नगर मंडळात मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी IAS अधिकारी आशा पठाण होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये त्रिमूर्ती नगर मंडळ अध्यक्ष ईश्वरढेंगळे, माजी अध्यक्ष रितेश गावंडे, माजी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, माजी नगरसेवक लहुकुमार बेहते,पल्लवी श्यामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, वॉर्ड अध्यक्ष किशोर धर्मे, तसेच मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
sachin
 
 
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सोनाली चावरे आणि विजया गद्रे यांनी केले.वॉर्ड महामंत्री उदय माहुरे, शक्तीकेंद्र प्रमुख समर्थ रागीट, बूथ प्रमुख व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. IAS officer Asha Pathan या उपक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली असून, त्यांच्या यशाचा गौरव मंडळ स्तरावर साजरा करण्यात आला.
सौजन्य:सचिन चावरे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0