हडसनी येथे मंजुळाई दूध उत्पादक असोसिएशनचा बोनस वाटप कार्यक्रम

    दिनांक :27-Jul-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
Manjulai Milk Producers Association हडसनी येथे मंजुळाई दूध उत्पादक असोसिएशनतर्फे दूध उत्पादकांना मागील चार वर्षांचा दूधभाव फरक व बोनस वाटप कार्यक्रम झला. कार्यक्रमाला हदगावहिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड जिल्हा शिवसेना अध्यक्ष विवेक देशमुख, बळीराजा संस्थेचे अध्यक्ष देवानंद मोरे, के. के. देशमुख, प्रकल्प व्यवस्थापक संदीप शिंदे, बाबुराव कदम रुईकर, बडू तावडे, तसेच गावकरी मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Manjulai Milk Producers Association 
या वेळी आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल, तर मी स्वतः लक्ष घालून त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन दिले. सध्या अनेक सहकारी संस्था बंद पडत असताना, मंजुळाई दूध उत्पादक असोसिएशनतर्फे शेतकèयांना बोनस व लाभांश वाटप केले जात असल्याबद्दल आमदार कदम यांनी वसुधारा डेअरी आणि अमूल टीमचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना नांदेड जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर यांनी केले होते.