नागपूर,
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी प्रत्येय संस्थेची ६१ वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला सन २०२४-२०२५ मध्ये मृत पावलेल्या सभासदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सुरवात करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना मोमुन्टो व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सेवानिवृत्त सभासदांना शाल श्रीफळ, मोनुन्टो व ग्रामगीता देऊन गौरविण्यात आले.

आमसभेत २०२४-२०२५ च्या अंदाजपत्रकातील खर्चास मंजुरी देण्यात आली. सभासदांना १२% दराने लाभांश वाटपाचे ठराव प्रस्तावास मंजुरी ठराव पारीत करण्यात आला. अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयावर साधक बाधक चर्चा करुन सर्व सभासदांचे समाधान करण्यात आले. Nagpur News आभार: संस्थेचे सचिव राकेश कोपुलवार यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आले. सर्व सभासदांनी चहापानाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्षा संगिता आत्राम, उपाध्यक्ष नितीन खरबडे, सचिव राकेश कोपुलवार, कोषाध्यक्ष डाॅ.चंद्रमणी सहारे, तसेच संचालक: दर्पण गजभिये, रितेश पुरकाम, विलास पंचम, शैलेश फुलझेले, रुपा हुद्दार उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र