अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur police Bharosa Cell पूर्वी घरात वाद-भांडण झाल्यानंतर थेट पाेलिस ठाण्यात धाव घेतली जात हाेती. त्यानंतर गुन्हे दाखल हाेऊन न्यायालयाची पायरी चढावी लागत हाेती. मात्र, शहर पाेलिस आयुक्तालयात 2017 पासून भराेसा सेल स्थापन करण्यात आले. गेल्या साठेआठ वर्षांत 18 हजार कुटुंबियांना भराेसा सेलने आधार दिला असून विधीसल्ला आणि समूपदेशनामुळे अनेकांचे संसार सुरळीत झाले आहेत.
काैटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वाद-विवादाच्या तक्रारी पूर्वी पाेलिस ठाण्यात नाेंद हाेऊन गुन्हे दाखल करण्यात येत हाेते. त्यामुळे अनेकांची संसार तुटण्याच्या काठावर येत हाेती. वाद मिटल्यानंतरही गुन्हे दाखल असल्यामुळे न्यायालयीन समेमिरा राहत हाेता. राज्यातील पहिले कुटुंब मार्गदर्शन आणि समूपदेशन केंद्र म्हणजेच भराेसा सेलची स्थापना 2017 मध्ये पाेलिस आयुक्तालयात करण्यात आली. भराेसा सेलमध्ये महिला पाेलिस अधिकारी आणि कर्मचाèयांसह कुटुंब समूपदेशकांची नियुक्ती करण्यात आली. काैटुंबिक हिंसाचाराच्या किंवा वैवाहिक जीवनात आलेल्या अडअडचणींबाबतच्या तक्रारींची नाेंद पाेलिस ठाण्यात न हाेता थेट भराेसा सेलमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हे दाखल हाेण्याऐवजी पती-पती, कुटुंब, नातेवाईक यांचे समूपदेशन करुन काैटुंबिक समस्या अगदी सामंजस्याने साेडविण्यात येत आहेत.
गेल्या आडेआठ वर्षांत भराेसा सेलमध्ये 17 हजार 976 तक्रारींची नाेंद करण्यात आली. या तक्रारींपैकी 14 हजार 387 कुटुंबीयांचे भराेसा सेलकडून समुपदेशन करण्यात आले. काैटुंबिक हिंसाचारासह किरकाेळ स्वरूपाच्या तक्रारीसुद्धा भराेसा सेलमध्ये करण्यात येतात. काही संवेदनशील तक्रारी साेडवताना पाेलीस आणि समुपदेशकांना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु, भराेसा सेलमधील अनुभवी समुपदेशकासह पाेलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाèयांच्या मदतीने समस्यांवर ताेडगा काढला जात आहे. भराेसा सेल हे महिलांसाठी माहेरघर असल्याचे म्हटले जाते. येथे महिला,माहेरची मंडळी, सासरची मंडळी किंवा स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांबाबतच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येते.
अनैतिक संबंधाबाबत सर्वाधिक तक्रारी
लग्न झाल्याच्या काहीच दिवसांनंतर पती-पत्नीत खटके उडायला लागतात. एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे किंवा दाेघांचेही अनैतिक किंवा विवाहबाह्य संबंधाबाबत सर्वाधिक तक्रारी भराेसा सेलमध्ये असतात. अशा प्रकरणात दाेघांचेही समुपदेशन करून संसार तुटण्यापासून वाचवण्यासाठी पाेलिस अधिकारी आणि समूपदेशक सकारात्मक प्रयत्न केल्या जाते.
विस्कटलेली 7 हजार कुटुंब एकत्र
भराेसा सेलमध्ये आलेल्या तक्रारींमधील 6 हजार 933 दाम्पत्याचा संसार विस्कटलेला हाेता. त्यांना समूपदेशन आणि विधी सल्ला देऊन त्यांचा संसार सावरण्यात आला. सासरच्या किंवा माहेरच्या मंडळींचा अतिरिक्त हस्तक्षेपामुळे अनेकांच्या संसारात विघ्न आल्यानंतरही भराेसा सेलने सामंजस्याने तिढा साेडवून तक्रारींची निपटारा करण्यात आला.
भराेसा सेलमध्ये महिलांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी घेण्यात येतात. प्रशिक्षित पाेलिस अधिकारी आणि अनुभवी समूपदेशांकडून कुटुंबियांचे समूपदेशन करण्यात येते. गेल्या साडेसात वर्षांत भराेसा सेलने 18 हजारांवर तक्रारी हाताळल्या आहे. भराेसा सेलमुळे नागरिकांचा पाेलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
- सीमा सूर्वे (वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, भराेसा सेल)