विठ्ठल नगरमध्ये ज्येष्ठांचा सत्कार सोहळा

वाढत्या वयाचं कौतुक –

    दिनांक :27-Jul-2025
Total Views |
नागपूर,
Vitthal Nagar Nagpur दक्षिण नागपूर येथील विठ्ठल नगर १ ज्येष्ठ नागरिक समितीतर्फे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या सामूहिक वाढदिवस उपक्रमांतर्गत यावेळी ७ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठल नगर १ येथे झाले. अध्यक्षस्थानी प्रा. रमण सुब्रमण्यम कनुमल्ला होते.वाढदिवस साजरे करण्यात आलेल्या मान्यवर सदस्यांमध्ये अशोक लाजुरकर, लीलाधर शिरसागर, निशिकांत कपूर, मारोतराव पावडे, योगिराज सिंह ठाकूर, राजू मेश्राम आणि राम लांडे यांचा समावेश होता.
 

dev 
 
या विशेष दिवशी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी "मी ज्येष्ठ नागरिक आहे" असे लिहिलेली पांढरी टोपी घालून सामूहिक वाढदिवस साजरा केला. समितीचा उद्देश फक्त सन्मान नाही, तर त्यांचा जीवनानुभव, स्मृती आणि योगदान जपणे हाच आहे, असे संयोजकांनी सांगितले. Vitthal Nagar Nagpur कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र त्रिवेदी यांनी केले, तर आभारप्रदर्शन शामराव गोमासे यांनी मानले.कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र