जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहावे

    दिनांक :27-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
Yellow alert for the district नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने बुलढाणा जिल्ह्यासाठी ’यलो अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, आणि खामगाव या तालुयांमधील अनेक लहान आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग होण्याची शयता असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूर सद़ृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विशेषतः नदीकाठी आणि सखल भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आश्वस्त केले आहे की कोणत्याही मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
 
 
alert