ऋषीमुनींच्या तपोभूमीत शिवभक्तांचा मेळा

28 Jul 2025 09:46:23
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया,
gondia-shiva-temple जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा गावाजवळ नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत असलेल्या पोंगेझरा प्राचीन शिवालयात अनेक ऋषीमुनींनी तपसाधना केली आहे. त्यामुळे या तपोभूमीत वर्षभर भाविकांच्या रांगा लागत असतात. त्यातच महाशिवरात्री व श्रावण महिन्यात शिवभक्तांची चांगलीच रेलचेल असते. दरम्यान, आज, सोमवार, २८ जुलै रोजी शुक्ल श्रावण मासातील पहिला श्रावण सोमवार असल्याने या तपोभूमीत शिवभक्तांचा मेळा राहणार असून नागझिर्‍याच्या घनदाट जंगलात ‘हर हर महादेव’चा गजर होणार आहे.
 
 
gondia-shiva-temple
 
गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १५ ते २० किमी अंतरावर नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात बोळुंदा प्राचीन पोंगेझरा, गायमुख देवस्थान आहे. रामायण काळापासून या देवस्थानाला महत्त्व असून रामायण काळात महर्षी मेघा यांचे आश्रम याच ठिकाणी होते. यानंतर महर्षी मुक्तानंद स्वामी, रामजी महाराज, अनेकानंद स्वामी या संतांनीही याच ठिकाणी तपश्चर्या केली. त्यामुळे या देवस्थानाला तपोभूमी ही ख्याती प्राप्त झाली. gondia-shiva-temple निसर्गरम्य जंगल परिसर डोंगराच्या पायथ्याशी हे देवस्थान आहे. गायमुखातून निरंतर शुद्ध पाणी वाहत असून काही अंतरापर्यंतच ते वाहताना दिसून येते, त्यामुळे हे आश्चर्य पाहण्यासाठीदेखील भाविकांसह पर्यटकांचा कल या देवस्थानाकडे असतो. दरम्यान, वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल या तपोभूमीत होत असतानाच महाशिवरात्री, मकर संक्राती, हनुमान जयंती, चैत्र नवरात्री व श्रावण मासामध्ये अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. विशेष म्हणजे, श्रावण मासाच्या निमित्ताने दर सोमवारी विशेष पूजन, महाभिषेक आदी कार्यक्रमामुळे या ठिकाणी भाविकांची आलोट गर्दी पहायला मिळते. यंदाच्या श्रावण मासातही ऋषीमुनींच्या या तपोभूमीत शिवभक्तांचा मेळा पहावयास मिळणार आहे.
इंग्रजांच्या गॅजेट बुकमध्ये उल्लेख
प्राचीन पोंगेझरा देवस्थानाचे मोठे इतिहास आहे. इंग्रज काळातही या देवस्थानाची ख्याती कायम असून इंग्रजाच्या १९०८ या वर्षीच्या गॅजेट बुकमध्ये ११९ व्या पानावर पोंगेझरा गायमुख अशी नोंद केली आहे.

पोंगेझरा देवस्थानात वर्षाकाठी दीड ते दोन लाख भाविक येत असतात. या मंदिराचा उल्लेख इंग्रजाच्या गॅजेट बुकमध्ये आहे. विशेष म्हणजे, येथील गायमुख संतांच्या तपापासून प्रगट झाले असल्याचे पूर्वजांनी सांगितले आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून भाविकांनी लाभ घ्यावा.
- सुरेंद्र बिसेन
संचालक, पोंगेझरा देवस्थान ट्रस्ट, बोळूंदा
Powered By Sangraha 9.0