नागपूर,
Book Bank to be inaugurated today श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, नागपूर यांच्यावतीने इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि ‘बुक बँक’ उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज (दिनांक २८ जुलै) सायंकाळी ६ वाजता आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आमदार संदीप जोशी असून, त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि पुस्तके शेअर करण्याची संस्कृती रुजवण्याचा संकल्प केला आहे. माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

यावेळी ‘बुक बँक’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पुस्तकांचा वापर करता येईल. जुन्या विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके इतर गरजू विद्यार्थ्यांना दिली जातील, अशी या योजनेची रचना आहे. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार हलका होणार असून Book Bank to be inaugurated today समाजात ज्ञानाची देवाणघेवाण वाढेल. या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रवणतेला आणि शिक्षण क्षेत्रावरील त्याच्या योगदानाला मानाचा मुजरा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. 16 ड पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.