चंद्रपूर,
Irai Dam जिल्ह्यात मागील चार दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे इरई धरणातील जलसाठ्यात वाढ झाली असून, सोमवार, 28 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणार्या या धरणाचे 1 आणि 7 क्रमांकाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. नागभीड, सावली, सिंदेवाही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड हे चार धरण 100 टक्के भरले असून, घोडाझरी धरणात 78.80 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. Irai Dam इरई धरणातही 59.21 टक्के जल साठा झाल्याने सोमवार, 28 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता या धरणाचे 1 आणि 7 क्रमांकाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असून, महानगर प्रशासनातर्फे नदी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.