दहा जीवंत काडतूस व दोन पिस्तूलासह एकजण ताब्यात

28 Jul 2025 15:05:19
गोंदिया, 
gondia-news दहा जीवंत काडतूस व दोन पिस्तूलांसह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखाच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २७ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मुरपार शिवारात करण्यात आली. प्रशांत केशव सोनवाने (१८, रा. बारो जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
जिवंत काडतूस जप्त
 
 
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना गोंदिया येथून बालाघाट येथे एक व्यक्ती अग्नीशस्त्र (पिस्तूल) विक्री करण्यासाठी दुचाकीने जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रावणवाडी पोलिस ठाण्यातंर्गत गोंदिया-बालाघाट मार्गावर मुरपार शिवारात नाकाबंदी केली असता आरोपी प्रशांत सोनवाने यास थांबवून त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्याजवळ प्रत्येकी ५० हजार रूपये किमतीचे दोन अग्नीशस्त्र (पिस्तूल), ५ हजार रूपये किमतीचे १० जीवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी अग्नीशस्त्र काडतूस जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपीच्या विरोधात रावणवाडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदाचे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावणवाडी पोलिस करीत आहेत.gondia-news ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, संजय चौहान, सोमेंद्रसिंह तुरकर, पोलिस शिपाई छगन विठठले, राकेश इंदूरकर, योगेश रहिले, चालक पोलिस हवालदार लक्ष्मण बंजार यांनी केली.
Powered By Sangraha 9.0