क्षुल्लक वादातून इसमावर चाकूहल्ला

दोघांना अटक

    दिनांक :28-Jul-2025
Total Views |
हिंगणघाट,
Isma stabbed over trivial dispute वाहनाच्या चावीवरून क्षुल्लक वाद झाला. दुसर्‍या दिवशी चावी देण्याच्या बहाण्याने बोलावले. मात्र, पुन्हा वाद घालत चाकूने वार करून जखमी केल्याची घटना २७ रोजी रामनगर वार्डातील हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. चंदू कांबळे (३७) असे जखमीचे तर आदेश डफ व भूषण रा. रामनगर वार्ड असे मारहाण करणार्‍यांचे नावं आहेत.
 
 
Isma stabbed over trivial dispute
 
चंदू कांबळे आणि आदेश डफ यांच्यामध्ये वाहनाच्या चावीवरून शहरातील संविधान चौकानजिकच्या हनुमान मंदिराजवळ वाद झाला. दरम्यान, रविवारी चावी परत देण्याच्या बहाण्याने आदेश डफ व भूषण यांनी चंदू कांबळे याला बोलावले होते. यावेळी सुद्धा दोघांनी चंदूसोबत वाद घातला. Isma stabbed over trivial dispute वाद विकोपाला गेला आणि आदेश व भूषण यांनी चंदूवर चाकूने सपासप वार केले. यात चंदू कांबळे गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच चंदूचे मित्र अमरदीप दारुडे, प्रदीप बागेश्वर यांनी चंदूला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉटरांनी जखमीला वर्धा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे, चंद्रशेखर वाढवे यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली.