हिमाचल,
Nitika हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात १ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी आणि पुराच्या दुर्घटनेत अनाथ झालेल्या नीतिका या १० महिन्यांच्या बालिकेला ‘चाइल्ड ऑफ द स्टेट’ घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुख-आश्रय योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नीतिकाची संपूर्ण जबाबदारी आता राज्य सरकारने स्वीकारली आहे.
राज्याचे Nitika राजस्व मंत्री जगत सिंह नेगी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “नीतिका डॉक्टर, इंजिनीयर किंवा अधिकारी जे काही व्हायचं ठरवेल, त्यासाठी लागणाऱ्या शिक्षणाची व इतर सर्व जबाबदाऱ्या सरकार घेईल. तिच्या भविष्याबाबत सरकार कटिबद्ध आहे.”मुख्यमंत्री सुख-आश्रय योजना ही २०२३ मध्ये सुरू करण्यात आली असून अनाथ बालकांना निवारा, अन्न, वस्त्र, उच्च शिक्षण, तसेच कौशल्य विकासासाठी संधी उपलब्ध करून देते. या योजनेंतर्गत १८ ते २७ वयोगटातील अशा अनाथ तरुण-तरुणींनाही लाभ मिळतो, जे बेरोजगार आहेत किंवा ज्यांच्याकडे राहण्याची जागा नाही.
नीतिकाचे वडील रमेश (३१) यांचा Nitika मृत्यू तलवाडा गावात झालेल्या पुरात झाला होता. ते घरात शिरणारे पाणी थांबवण्यासाठी बाहेर गेले असताना हे दुःखद अपघात घडला. तिची आई राधा देवी (२४) व आजी पूर्णु देवी (५९) त्या रात्री मदतीसाठी बाहेर गेल्या, परंतु तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. दुर्घटनेनंतर शेजारी प्रेम सिंह यांनी नीतिकाला घरात एकटी रडताना पाहिले आणि तिच्या नातेवाइक बलवंत यांना याची माहिती दिली. बलवंत हे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांचे खासगी सुरक्षा अधिकारी आहेत.सध्या नीतिका तिच्या बुआ किरना देवीसोबत शिकौरी गावात राहत आहे, जे तलवाडा गावापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. राज्य सरकारने तिच्या दीर्घकालीन संगोपनाची जबाबदारी घेतली असून हा निर्णय केवळ एका बालिकेच्या भविष्याची नव्हे, तर संवेदनशील राज्यकर्तृत्वाचीही साक्ष देणारा आहे.