कारगिल विजय दिनानिमित्त ‘इवान’तर्फे देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा

28 Jul 2025 18:06:16
नागपूर,
Patriotic painting competition माजी वायुसैनिक कल्याण संघटना, नागपूर (इवान) ही संघटना २०११ पासून समाजात देशभक्ती जागवण्याचे कार्य करीत आहे. त्या अनुषंगाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून बी.आर.ए. मुंडले सभागृहात “कारगिल विजय दिवस”, “देशभक्ती सर्वोपरी” आणि “ऑपरेशन सिंदूर” या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
 
Patriotic painting competition
 
या उपक्रमात नागपूर शहरातील २२ शाळांमधील एकूण ३४५ विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते १२ या वेळेत सहभाग नोंदवला होता. शाळांतील शिक्षकांनीही या उपक्रमात विशेष उत्साहाने सहभाग घेतला. Patriotic painting competition स्पर्धेच्या आयोजनासाठी इवान अध्यक्ष लक्ष्मीकांत नांदरुणकर, इवान पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष मेहनत घेतली.
 
स्पर्धा दोन गटात (इ. ५वी ते ७वी आणि इ. ८वी ते १०वी) पार पडली. विजेत्या विद्यार्थ्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी अमर जवान स्मारक येथे रोख पारितोषिक व शाळांमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. Patriotic painting competition या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवणे आणि त्यांना संरक्षण सेवांमध्ये करिअरसाठी प्रेरित करणे हा होता. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बी.आर.ए. मुंडले सभागृहाचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: अजय गाढवे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0