अरे देवा... आमिर खानच्या घराबाहेर पोलिसांचा ताफा Video

28 Jul 2025 14:21:23
मुंबई,
Aamir Khan बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान यांच्याबाबत सोमवारी सकाळपासूनच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त दिसून आल्याने विविध चर्चांना उधाण आलं. नेमकं काय घडलंय, असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला होता. अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली होती. मात्र आता या प्रकरणामागचं सत्य समोर आलं असून, सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 

Police convoy outside Aamir Khan house 
 
 
IPS अधिकाऱ्यांची होती भेट
 
 
आमिर Police convoy outside Aamir Khan house खान यांच्या टीमने स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या घरी पोलिस फोर्स कुठल्याही तक्रारीमुळे किंवा गुन्ह्यामुळे आलेली नव्हती, तर सध्या प्रशिक्षण घेणाऱ्या IPS अधिकाऱ्यांच्या एका बॅचने आमिर खान यांच्यासोबत भेटीची विनंती केली होती. ही विनंती स्वीकारून आमिर खान यांनी स्वतःच त्यांना आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.हे पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधीही आमिर खान यांची पोलीस प्रशिक्षणार्थींशी अशाच प्रकारची भेट झाली आहे. 1999 मध्ये आलेल्या 'सरफरोश' या चित्रपटात त्यांनी एका कर्तव्यदक्ष IPS अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेने अनेकांना प्रेरणा दिली होती. त्यानंतर अनेक पोलीस प्रशिक्षणार्थी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आमिर खान यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यांनी आपल्या सिनेमॅटिक अनुभवातून त्यांना मार्गदर्शनही केलं आहे.
 
 
 
                                                                            
                                                            
 
 
‘सितारे जमीन पर’ची दमदार कमाई
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आमिर खान यांची अलीकडील फिल्म ‘सितारे जमीन पर’ होती. ही 2008 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल होती. या चित्रपटाने भारतात सुमारे 160 कोटी रुपयांची कमाई केली. तर विदेशातही या चित्रपटाने सुमारे 100 कोटी रुपये कमावले. एकूण मिळकतीचा विचार केल्यास या चित्रपटाने जगभरातून 262 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
Powered By Sangraha 9.0