नागपूर,
Swadeshi Awakening Forum समृद्ध, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी आणि प्रेरणादायी देशाच्या रक्षणासाठी स्वदेशीला प्राधान्य देणे नितांत आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संघटक काश्मिरी लाल यांनी केले.कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने कॅट कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण भारतीय, श्वेताली ठाकरे, राजकुमार गुप्ता, किशन धाराशिवकर, विनोद गुप्ता, ज्ञानेश्वर रक्षक, अजय पत्की, गोविंद पटेल, राजू जैन, धनंजय भिडे, शिरीष तारे, पुरुषोत्तम गुरव, मधुसूदन सारडा, प्रज्ञा मोदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण भारतीय म्हणाले, स्वदेशीच्या मंत्रानुसार आपल्या देशाला समृद्ध परिश्रम घ्यावे लागणार आहे. पूर्वी स्वदेशी क्रीडा प्रकार खेळल्या जात होते. मात्र आता युवकांच्या हाती मोबाईल आले आहे. युवक ड्रोनबद्दल बोलतात. नवोपक्रम आणि स्टार्टअपकडे युवक आकर्षित झाले आहे. पूर्वी जिथे चरख्याची चर्चा होती, तिथे आता चांद्रयानाची चर्चा होत आहे. स्वदेशी जागरण मंचने परकीय गुंतवणूक किंवा थेट परदेशी गुंतवणुकीला विरोध नाही, तर परदेशी कंपन्या किंवा व्यावसायिकांनी परकीय गुंतवणुकीच्या नावाखाली आपली स्वदेशी बाजारपेठ काबीज करू नये, असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकांनी मनापासून स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला अतिरिक्त बळ प्राप्त होणार असल्याचे श्वेताली ठाकरे यांनी सांगितले.
...