ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे यांचे निधन

28 Jul 2025 10:14:07
नागपूर,
Shubhangi Bhadbhade passes away सुप्रसिद्ध लेखिका, ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने वैदर्भीय साहित्यसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाची ८० वर्षं पूर्ण झाल्यानंतरही सातत्याने लेखन करणाऱ्या शुभांगी भडभडे या खऱ्या अर्थाने अखंड साहित्यसाधनेत रमलेल्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी सुमारे ८० कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तसेच वैचारिक लेखन करत मराठी साहित्यात मोलाची भर घातली. विशेषतः चरित्रात्मक कादंबरी हे त्यांचे लेखनविशेष राहिले. त्यांच्या लेखनात संवेदनशीलता, शोधक वृत्ती आणि सामाजिक जाणिवेची स्पष्ट छाप होती.
 
 
Shubhangi Bhadbhade passes away
 
लेखक म्हणूनच नव्हे, तर एक उत्तम साहित्य संघटक म्हणूनही त्यांची ओळख होती. वैदर्भीय लेखकांना मंच मिळावा या हेतूने त्यांनी 'पद्मगंधा प्रतिष्ठान'ची स्थापना केली. Shubhangi Bhadbhade passes away या संस्थेमार्फत अनेक साहित्यिक उपक्रम त्यांनी राबवले आणि नवलेखकांना प्रोत्साहन दिले. शुभांगी भडभडे यांचे जाणे ही केवळ एक साहित्यातील क्षती नसून, एक प्रतिभावंत साहित्यसेविका गमावल्याचे दुःख साहित्यविश्वाला आहे. त्यांचे साहित्य आणि कार्य प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत विविध साहित्यिक वर्तुळातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0