नागपूर,
ajni-railway-station-transformation : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणार्या अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास वेगाने केल्या जात आहे. अजनी स्थानकाला एक आधुनिक आणि प्रवासी-अनुकूल स्वरूप देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नवीन सुविधांमुळे रेल्वेच्या प्रवासी सुविधा आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. एकंदरीत अजनी स्थानकाचा कायापालट होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. भविष्यातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन, प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल रेल्वे प्रशासनाने टाकले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली आहे.
पश्चिम भागात बुकिंग कार्यालय
अजनी स्थानकाच्या पश्चिम भागात २ मजली इमारतीचे बांधकाम केल्या जात आहे. तर पूर्व भागातील प्लास्टरचे काम पूर्ण झाल्याने वेगळा लुक मिळाला पश्चिम भागात असलेले बुकिंग कार्यालय आणि अन्य विभागांचे कक्ष आता यशस्वीरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच इतर कामांना प्राधान्य देत प्रवासी सुविधांकडे अधिक लक्ष दिल्या जात आहे.
तीन नवीन फुटओव्हर ब्रिज
अजनी पुनर्विकासाच्या कामात मुख्य आकर्षण म्हणजे ७२ मीटर रूंदीचा रूफ प्लाझा तयार केल्या जात आहे. प्रवासी सुविधांसह आगमन प्रस्थान करण्यासाठी सेंट्रल कक्ष एक आकर्षणाचे केंद्र होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी तीन नवीन फुटओव्हर ब्रिज तयार करण्यात येत आहेत, त्यापैकी एक १८ मीटर रुंद ब्रिज असेल. मुख्य इमारतीसह नव्या स्थानकात २१ लिफ्ट, १७ एस्केलेटर आणि ६ ट्रॅव्हलेटर असेल. अजनी स्थानकावर येणार्या प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल सुविधा देण्याचा आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दिशादर्शक फलक लावल्यानंतर प्रवाशांना सहज वावरता येणार आहे.
पर्जन्य जल संचयनाची व्यवस्था
रेल्वेस्थानकाची इमारत ग्रीन बिल्डिंग मानकांचे पालन करणार आहे. सौर उर्जा पॅनेल, पाण्याच्या बचतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि पर्जन्य जल संचयनाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ तसेच ६ व हे प्लॅटफॉर्ममध्ये उच्चस्तरीय दर्जाचे होणार आहे.