बुलढाणा,
Shri Mahakal Kawad Group बुलडाणा शहरामध्ये राजे छत्रपती श्री. संभाजी नगरच्यावतीने दरवर्षी मानाची कावड यात्रा महाकाल ग्रुपच्यावतीने काढण्यात येत असते यावर्षी श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते बुलढाणा पर्यंत कावड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये कावडधर्यांनी बुलढाणा शहरात पहिल्या श्रावण सोमवारी दि. २८ जुलै रोजी कावड यात्रेची आगमन झाल्यानंतर मोठ्या जल्लोषमय स्वागत केेले.
बुलडाणा शहरातून मानाची कावड यात्रा निघाली जयस्तंभ चौक येथे कावडचे तसेच भगवान महादेवाचे पूजन शिवसेनेचे युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी केले. Shri Mahakal Kawad Group हर हर महादेवाच्या गजरामध्ये गजेंद्र दांदडे, आशिष जाधव, श्रीकांत गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात श्री महाकाल भक्त उपस्थित होते.